|| आईसाहेब ||

 
सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोsस्तु ते ॥
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे । सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोsस्तु ते ॥
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते । भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोsस्तु ते ॥
भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोsस्तु ते ॥

श्री क्षेत्र सप्तश्रृंगी ग़ड स्थान महात्म्य
प्राचीन काळापासुन मांनव शक्तिची उपासना करीत आहे. मानवी जिवनात शक्ति उपासनेला विशेष महत्तव आहे. श्री जगदंबेची ५१ पिठे भुतलावर असुन उपासकांना त्यापासुन लाभ झाला आहे.
या शक्तीपिठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्ह स्वरुपीणी धर्मपीठ ओंकार स्वरुप आधिष्ठीत आहे. आणि तेच म्हणज़े सप्तश्रृंग गडावरील श्री. सप्तश्रृंगी देवी होय. दुष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सप्तश्रृंगीचे पुराण काळापासुन असलेले महातम्य लक्षात घेता या देवीची स्वयंभु अशी मुर्ती असुन नवनाथ सांप्रदायातुन नाथापासुनचा कालावाधी स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्र शक्ती ही देवी सप्तश्रृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तरोत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर , पेशवे सरकार, दाभाडे, विंचुरकर, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पिठाशी अगदी जवळचा संबंध होता असे दिसुन येते.
पुर्ण पिठ सप्तश्रृंगी गड
पुर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलवता सर्व देवांना बोलवले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसतांना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही. त्यामूळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळाल्यानंतर त्याने यज्ञात विध्वंस केला. सतीचे कलेवर हातावर घेउन श्री. शंकर त्रेलोक्यात हिंडु लागले. ही स्थिती पाहून विष्णुने सुदर्शन चक्र सोडले व सतिच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पडले. हिच ५१ शक्तीपीठे म्हणुन गणली जाउ लागली.
महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, तुळजापुरची महासरस्वती, माहुरची महाकाली आणि वणी ची सप्तश्रृंगी देवी आहे. परंतु आदी शक्तीचे मुळ स्थान सप्तश्रृंग गड हेच होय. ओकारातील मकार पुर्ण रुप होऊन सप्तश्रृंग गडावर स्थिरावला म्हणुन हेच मुळ रुप आणि हिच आदिमाया. अठरा हातांची ही महिषासुर मर्दिनी श्री. महालक्ष्मी देवी, श्री. महाकाली व श्री. महासरस्वती होय. या त्रियुगणात्म्क स्वरुपात आद्यस्वयंभु शक्तीपीठ म्हमणुण श्री. सप्तश्रृंग देवीचा उल्लेख पोरणिक ग्रंथातुन आढळतो.