गडावरील सुविधा व् उत्सव


निवासाची सोय
भाविकांनी गडावर निवासाच्या सोयीसाठी ट्रस्टने धर्मशाळेमध्ये २०० खोल्या उपलब्ध केलेल्या आहेत. धर्मशाळा कार्यालय सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत उघडे असते. धर्मशाळेच्या खोलीसाठी आरक्षण पध्दत नाही. गडावर आल्यानंतर खोली मिळेल व खोली एका दिवसासाठी मिळेल.
प्रसादाची सोय

प्रसादलयात भाविकांसाठी सकाळी ११ ते २.३० व रात्री ७ ते ९.३० या वेळेत प्रसादाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे.

पूजा विधी

श्री भगवतीचे मंदिर सकाळी ६.०० वाजेपासून ते रात्री ८.०० वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. श्री भगवतीस अभिषेक, पूजा, पंचामृत अभिषेक पूजन, सप्तशती पाठ, नेवैद्य, नंदादीपसाठी तेल, तुप, आरती, पातळ, खण ओटी व दुग्ध पूजा साहित्य इत्यादीसाठी ट्रस्ट कार्यालयात चौकशी करावी.

श्री भगवतीस मंदिरात जाताना प्रवेश द्वाराजवळील/उपकार्यालयात श्री भगवतीसाठी आणलेले पातळ मौल्यवान वस्तूंची नोंद करावयाची असते.

पूजा नियमावली
१) श्री भगवतीस पंचामृत अभिषेक पूजा२१०१ – ००
२) श्री भगवतीस दुग्ध अभिषेक३५१ – ०००
३) श्री भगवतीस अभिषेक पूजा१०१ - ००
४) श्री भगवतीस महानेवैद्य१०१ - ००
५) श्री भगवतीस पातळ, खण ओटी पूज२५१ – ००

६) श्री भगवतीस सप्तशती पाठ पूजा 
१) साधा पाठ
२) पल्लव पाठ 
३) संपुष्ठीत पाठ 


१०१ – ००
१५१ – ०० 
२५१ – ००
७) श्री भगवतीचे पूजेसाठी हळद, कुंकु,
बुक्का, दुग्ध इ. पूजा साहित्य
१०१ – ००
८) श्री देवीचे नंदादीपासाठी 
१) १ दिवसाचे तेलासाठी 
२) ८ दिवसाचे तेलासाठी 
३) १५ दिवसाचे तेलासाठी 
४) ८ दिवसाचे तुपसाठी

५१ – ००
३५१ – ००
५०१ – ००
१०१ - ०० 
९) श्री भगवतीस शेंदूर लेपन करण५०१ – ००


गडावरील उत्सव
१. गुढीपाडवा
या दिवशी सकाळी मंदिरात गुढी ऊभारली जाते. श्री भगवतीची पंचामृत अभिषेक करुन महापूजा केली जाते. श्री भगवतीस व अलंकार घालून मंगलमय वातावरणात परिसरात एक नवचैतन्य येते.

२. चेत्रोत्सव
हा उत्सव राम नवमी पासून ते चेत्र पोर्णिमेपर्यंत सुरु असतो. श्री भगवतीची दररोज पंचामृत पूजा केली जाते. भाविक आपआपले नवस फेडीत असतात. रामनवमी पासून सुरु होणारा हा उत्सव वाढत जावून चतुर्दशीला उच्‍चांक गाठला जातो. याच दिवशी भगवतीच्‍या ध्‍वज शिखरावर लावण्‍यासाठी ट्रस्‍टच्‍या कार्यालयापासून ध्‍वजाची मिरवणूक सुरु होते. भाविक मोठया भक्‍तीने ध्‍वजाला नमस्‍कार करतात. पोर्णिमेच्‍या दिवशी सकाळी सर्व भाविकांना श्री भगवतीच्‍या शिखरावर लावलेल्‍या ध्‍वजाचे दर्शन होते. लाखोंच्‍या संख्‍येत भाविक गडावर येउन श्री. भगवतीचे दर्शन घेतात.
४. गोकुळ अष्टमी
या दिवशी पाय-यावरील कृष्ण मंदिरात विशेषत्वाने पूजा अर्चा करुन आरती केली जाते. नंतर श्री भगवतीची महापूजा करुन आरती केली जाते. रात्री १२ वाजता कार्यक्रमाची सांगता होते.
५. श्री भगवतीची नवरात्रोत्सव
श्री सप्‍तश्रृंग निवासीनी देवीचा नवरात्रोत्सव अश्विन शुध्द प्रतिपदेला सुरु होतो व त्याची सांगता कोजागिरी पोर्णिमेस रात्री १२ वाजता श्री भगवतीची महापूजा करुन केली जाते. मंदिरात दररोज शांतीपाठ केले जातात. मंगलमय वातावरणाने परिसरात एक नवचैतन्य येते. अश्विनातील नवरात्रउत्सव म्हणजे सप्‍तश्रृंग गडावरील आनंदोत्सव. प्रतिपदेला देवी जवळ घट बसवून नवरात्रास सुरवात होते. दररोज षोडषोपचारे पूजा, शांतीपाठ, सप्‍तशती पाठ व पुरणपोळीचा नेवैद्य देवीला दाखविला जातो. हा उत्सव नऊ दिवस गडावर येऊन घटी बसणा-यांची संख्या हजारोंनी असते. नवमीच्या रात्री होमहवन करुन दशमीला पूर्णाहुतीचा कार्यक्रम असतो. नवमीच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदिराच्या शिखरावर ध्वज लावला जातो.

६. श्री भगवतीचा कोजागीरी उत्सव
विजयादशमी नंतर गडावर श्री भगवतीचा कोजागीरी उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. कोजागिरी पोर्णिमेला श्री भगवतीच्या महापूजेसाठी पुणे भिमाशंकर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी, भोपाळ, इंदोर, शहादा, पिंपळनेर इत्यादी ठिकाणावरुन तापी, नर्मदा, क्षीप्रा, गोदावरी या नदीचे पवित्र जल पायी कावडीने गडावर आणतात व या जलाने श्री भगवतीला स्नान घातले जाते. कावडीने पाणी आणणा-यांची संख्या १० ते १५ हजारावर असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.
७. लक्ष्मीपुजन
सप्‍तश्रृंग गडावर लक्ष्मीपुजनाचा कार्यक्रम मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. या दिवशी श्री भगवतीचे दागिने व अलंकार यांची कार्यालयात पुजा केली जाते. त्या वेळेस सर्व गुरुजींना निमंत्रीत करुन शांतीपाठ करण्यात येतो व गुरुजींना दक्षिणा देण्यात येते. फटाक्यांची आतिषबाजी करण्या येते.
८. हरिहर भेट
या दिवशी मंदिरातील असलेल्या महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करुन श्री भगवतिची महापूजा केली जाते व हरिहरांची भेट घडवली जाते.
९. महाशिवरात्र
या दिवशी रात्री १० वाजता श्री भगवतीचे पंचामृत महापूजा केली जाते. रात्री १२ वाजता आरती करुन सर्वांना प्रसाद देण्यात येतो.